५६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आज १ नोव्हेंबर २०२3 .... सौ. शीला व श्री. शरद किराणे यांनी जन्माला घातलेल्या पाहिल्या आपत्याचा .... आराधनाचा ५६ वा वाढदिवस! .... हा प्रवासही खूप रोचक आहे ....

१९६७ साली याच दिवशी सौ. शीला व श्री. शरद किराणे यांनी आराधनाची मुहूर्तमेढ रोवली तीच मुळी ६० जणांच्या कश्मिर सहलीने. सुरुवातीला काश्मिरपेक्षा धार्मिक सहलींचे प्रमाण जास्त होते. पण ७ मे १९७७ च्या काश्मीर स्पेशल ट्रेननंतर ह्या जोडीने मागे वळून पहिलेच नाही.

दरवर्षी एकापेक्षा एक नाविन्यपूर्ण सहली जन्म घेऊ लागल्या .... आणि हिच आराधनाची खासियत ठरली. कोस्ट-टू-कोस्ट (मुंबई ते चेन्नई संपूर्ण समुद्र किनाऱ्याने), मध्य प्रदेश, १९७९ मध्ये श्रीलंका, ८० च्या दशकांत आशियातील सर्वात मोठा ग्रुप आफ्रिकन सफारीला नेण्याचा मान, १९८२ मध्ये अंदमान, १९८३ साली आसाम - मणिपूर - मेघालय - नागालँड - मिझोराम - अरुणाचल प्रदेश - त्रिपुरा - सेव्हन सिस्टर्स, १९८५ मधे लेह लडाख - अमरनाथ, १९८६ मध्ये मॉरिशस, १९९४ साली युरोप अशा विविध सहलींचा जन्म झाला.

१९९९ साली चीनला पर्यटक नेणारी पहिली प्रवासी संस्था म्हणून आराधनाची ओळख पर्यटनविश्वाला झाली ... तत्पूर्वी अमेरिका - कॅनडा, ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड या सहली सुरू होत्याच ... २००२ सालात व्हिएतनाम - कंबोडिया - इंडोनेशिया भर पडली.

ह्याशिवाय गेल्या शतकातील तीनही खग्रास सूर्यग्रहणांच्या सहली मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने... १९८० मध्ये रायचूर... १९९५ मध्ये नीम का ठाणा - राजस्थान आणि शतकातील शेवटचे १९९९ चे कच्छच्या रणात.... आयोजित करून यशस्वीपणे पूर्ण केल्या गेल्या.

याचे सर्व श्रेय शरद किराणे आणि शीला किराणे यांचेच .... या भिन्न व्यक्ती असूनही एकत्रितपणे एक संस्थाच होती …!

आम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आराधनाने ५५ वर्षाचा यशस्वी पल्ला पूर्ण केला. आजपर्यंत तुमची जी प्रेमाची आणि आपुलकीची साथ लाभली ती अशीच यापुढेही राहूद्यात एवढीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना.

खंत एकच .... २०२० ने अनेकांचे जसे नुकसान केले तसेच आराधनाचे ही .... ही जोडगोळी जी गेली ५२ वर्षे खांद्याला खांदा लावून भक्कमपणे एकमेकांना साथ देत उभी होती काळाने फक्त ६ महीन्याच्या अंतराने हिरावली .... परलोकाच्या प्रवासास निघून गेली .. त्यंनी ज्या आत्मविश्वासाने व चिकाटीने यशाची उंच शिखर गाठली ...... सध्याच्या अनुकूल परिस्थितीत आम्ही ती टिकवून ठेवून त्यांच्या इच्छा आकांक्षांना पुर्ण करु ... आणि हीच आम्हां सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली असेल

लेखक
मंदार किराणे आणि टीम आराधना